घोडेबाजार करण्यासाठी कोटींहून अधिक पैसे येतात कुठून?; संजय राऊत यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार चालण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला. “निवडणुकीत व राजकारणात घोडेबाजार करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये येतात. ते खरं पाहिले तर येतात कुठून? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसेच याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणीही केली आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी वातावरण चांगलं ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल त्यातून काही चांगला मार्ग निघत असेल तर चांगलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांना भेटून राज्याच्या प्रतिष्ठेसाठी काही चांगलं निघत असेल तर त्याचं स्वागत सर्वांनी केले पाहिजे.

तसे पाहिले तर घोडेबाजार नावाचा शब्द फार वाईट आहे. तो वाईट पद्धतीने सुरू झाल्याचे दस्त आहे. राजकारणात येणारा पैसा कुठून येतो? ही एक प्रकारे मनी लॉन्डरिंगची केस आहे. त्याचा तपास ईडीने करावा. आमदार विकत घेण्यासाठी पैशाची प्रलोभन दाखवली जात आहेत. आमच्याकडून कोणत्याही आमदाराला प्रलोभने दाखवली गेलेली नाहीत. ही प्रलोभने दाखवणारे कोण आहेत? कोटी कोटी रुपयांचे आकडे मी ऐकत आहे. त्यामागचे सूत्रधार कोण आहेत? याचा केंद्रीय तपास यंत्रणेने अभ्यास करावा, अशी मागणीही राऊतांनी केली.

Leave a Comment