काँग्रेसच्या ब्रेकफास्ट चर्चेत संजय राऊतही उपस्थित; यूपीएत सहभागी होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी १४ पक्षांचे जवळपास १०० खासदार उपस्थित आहेत. या बैठकीतच शिवसेना नेते खासदार संजय राऊतदेखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ वरुन मोदींना चांगलाच टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधानांची चाय पे चर्चा असते तशी आमची ब्रेक फास्ट चर्चा आहे. खरं तर आम्हाला पंतप्रधानांनी बोलवायला हवं होतं. ते सर्वांचेच पंतप्रधान आहेत पण ते त्यांच्याच लोकांना बोलावतात. आम्हाला पाणीही विचारत नाहीत असे राऊत म्हणाले.

काँग्रेस कडून शिवसेनेला मानाचे स्थान-

दरम्यान यावेळी संजय राऊत याना राहुल गांधी यांच्या जवळच बसण्याची संधी मिळाली. तस पाहिलं तर शिवसेना एनडीए मध्ये नसली तरी यूपीए मध्येही शिवसेनेने थेट उडी घेतली नाही. तरीही काँग्रेसकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली जात असल्याचं स्पष्ट होत आहे. भविष्यात राष्ट्रवादीसोबत शिवसेनेलाही सोबत ठेवण्याची काँग्रेसची भूमिका असू शकते.

Leave a Comment