मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राऊत पवार यांच्या सिल्वरओक बंगल्यावर पोहोचले असून राऊत आणि पवार यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा सुरु झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर आम्ही त्यावर विचार करु असे पवार म्हणाले होते. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेना युतीत चांगलंच वादंग उठलं असताना आता राऊत पवारांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्या नजरा या भेटीत काय चर्चा होणार याकडे लागल्या आहेत.
पवार आणि राऊत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राची पुढील पाच वर्षांची राजकीय समीकरणे बदलू शकतात असे बोलले जात आहे.