भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी आश्चर्य वाटणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी राजकारण तापलं असून महाविकास आघाडी कडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी आश्चर्य वाटणार नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे. मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले.

ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही देखील काही संदर्भात व्यवस्थित माहिती दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकही कागदपत्रावर आणि पुराव्या वर केंद्रीय तपास यंत्रणाने अद्याप कारवाई केलेली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्यावर जरी कारवाई केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही कारण उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल. तसेच ईडीचा वापर पाळलेल्या गुंडा सारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment