सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज; आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवं – राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी झालेल्या गंभीर आरोंपांवर आज संजय राऊत यांनी आपले मत मांडले. यावेळी यावर मी काही बोलावं अशी परिस्थिती नाही. मात्र सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील प्रत्तेकाने आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवे असं विधान राऊत यांनी केले आहे.

आज दुपारी मी दिल्लीला जाणार आहे. शरद पवारही दिल्लीत आहेत. त्यांची भेट घेऊन मी या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. घडलेला प्रकार नक्कीच खळबळजनक आहे. लोकं म्हणतात हा लेटरबाॅम्ब आहे. पण पवार साहेब, मुख्यमंत्री याचा तपास करतील. आणि त्याची सत्यता तपासतील. स्वत: गृहमंत्री देशमुख यांनीही सदर पत्राची सत्यता पडताळण्याची मागणी केली आहे असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, सरकार मधील प्रत्तेक घटकाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपले पाय जमिनीवर आहेत का हे पाहणे गरजेचे. पोलिस प्रशासन हा सरकारचा कणा असतो. हा कणा सरकार चालवताना मजबूत ठेवायचा असतो असे आपण यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून जाणतो. महाविकास आघाडी सरकारचा कणाही मजबुत आहे. मात्र काही तरी दुरुस्त करावं लागेल असंही राऊत म्हणालेत.

दरम्यान, परमबीर सिंग हे माजी पोलिस आयुक्त आहेत. ते उत्तम अधिकारी होते. आत्तापर्यंत त्यांनी चांगली सेवा बजावली आहे. मात्र त्यांच्या पत्राची सत्यता पडताळणी करायला हवी. त्या पत्रामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. हे मान्य करण्याइतका माझ्याकडे मनाचा मोठेपणा आहे. यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पवार साहेब व मुख्यमंत्री ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील असं राऊत म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment