शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस असून देशभरातून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान, शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे, देशाचे सर्वात ज्येष्ठ, अनुभवी नेते म्हणून आम्ही शरद पवारांकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं मोठं योगदान आहे. शरद पवार प्रचंड लोकप्रपिय, जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत,” असं कौतुक संजय राऊत यांनी यावेळी केली.

81 वर्षांनंतरही शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, असं राऊत म्हणाले.

Leave a Comment