Tuesday, January 31, 2023

अमित शहा काश्मीरमध्ये असतानाच पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा, केंद्राने गांभीर्याने विचार करावा- संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केला.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली असून केंद्र सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं म्हंटल आहे.

संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काश्मीरमध्ये मुक्काम असताना देखील पाकिस्तान संघाचा T20 मधील विजय आणि भारताचा पराभव अशा प्रकारे साजरा होत असेल आणि भारतविरोधी घोषणा दिल्या जात असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

या व्हिडिओ मध्ये काश्मीर मधील नागरीक फटाक्यांची आतषबाजी करत असल्याचे आणि भारताविरोधी घोषणा देतानाचे स्पष्ट दिसत आहे. तर काही जण हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत आहेत असेही दिसत आहे.