Monday, January 30, 2023

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : कोणी कितीही आपटली तरी विजय आमचाच – संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच विरोधी पक्ष भाजप कडून देखील उमेदवार देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार असे संजय राऊत यांनी म्हंटल.

विरोधकांनी निवडणूक टाळली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचं वातावरण तयार केलं तरीही विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असेही संजय राऊत यांनी म्हंटल.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. तसेच विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.