Saturday, February 4, 2023

प्रश्न पैशांचा नाही तर स्वाभिमानाचा; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार खडाजंगी होत आहे. याच दरम्यान संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयेचा दावा ठोकणार असल्याचं म्हणल्यानंतर राऊतांनी दाव्याची किंमत वाढवावी असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता . यावर राऊतांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, प्रश्न पैश्यांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. ५०० कोटींचा दावा ठोकू किंवा १००० कोटींचा ठोकू पण स्वाभिमानाची किंमत असते. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला त्यांचे पैसे नकोत. त्यांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही. आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.