Monday, January 30, 2023

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन जमिनी शोधाव्या; राऊतांनी उडवली खिल्ली

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंच्या मालमत्तेची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे असं त्यांनी कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली आहे.

संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करु शकत नाही,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, सोमय्यांवर झालेल्या कारवाई बाबत मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही असेही त्यानी स्पष्ट केले.  गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल अंसही म्हटलं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे