संजय राऊत राहुल गांधींची घेणार भेट; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी सरकारला घेरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

लखीमपूरखेरी हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकार कडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून दडपशाही चालू असून याविरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे आणि आज आपण 4:15 वाजता राहुल गांधी यांना भेटणार आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. प्रियांका गांधींशी पोलिसांचं वागणं अत्यंत असभ्य होतं. पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा गुन्हा काय होता ती त्यांना ताब्यात घेतलं गेलं? केवळ राजकारण करायचं म्हणून करु नका, असा सल्लाही त्यांनी मोदी आणि योगी सरकारला दिला

You might also like