नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही अशाशब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली.

नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते असून ते अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. आम्ही त्यांच्या संघर्षाचा काळ पाहिला आहे. मोदी सरकारच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले. भाजपाने नेहमीच आघाड्या बनवून सत्ता मिळवली, पण मोदींच्या काळात एक हाती सत्ता स्थापन केली. ही त्यांच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हवं अस संजय राऊत यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही दिसत नाही. मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. तसेच देशातील जनतेच्या महागाई विषयीच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मोदीजी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणारा केक कापतात का, यावर आमचे लक्ष असेल, असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावला.

Leave a Comment