Sunday, May 28, 2023

संजय राऊतांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंवर हल्लाबोल म्हणाले…

कोल्हापूर | शिवेंद्रसिंहराजे यांनी शिवसेनेने छ. संभाजीराजे यांच्यावर गेम केली असे म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले, कोण ते अपक्ष आहेत. त्यांनी किती पक्ष बदलले. पक्षाचे वावडे आहे का? त्याच्या घराण्यात कोणी किती- किती वेळा पक्ष बदलेले. कशाकरिता आम्हांला तोंड उघाडायला लावताय. हा विषय आम्ही संपविलेला आहे. आम्हांला त्याच्याविषयी आणि गादीविषयी प्रेम आहे, तो तसाच राहिल.

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दोन दिवसीय कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी छ. संभाजीराजे यांच्याविषयी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी राज्यसभेचे उमेदवार संजय पवार उपस्थित होते. संजय राऊत पुढे म्हणाले, माझा दाैरा हा पूर्णपणे पक्षाची बांधणी करण्याकरिता आहे. पक्ष प्रमुखांच्या सूचना पदाधिकाऱ्यांपर्यत पोहचविणे. 2024 करिता तयार राहणे, याकरिता ही शिवसंपर्क यात्रा सुरू आहे. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी राज्यातील जनतेत एक आस्था आहे. राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका ही विरोधाला विरोधाची आहे. एखादा निर्णय महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचा घेतला तरी त्याला विरोध करायचा आहे, अशी भूमिका विरोधकांची आहे.

चंद्रकांत दादांनी चोमडेपणा करू नये : संजय राऊत

चंद्रकांत पाटील कोण ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे. ते कोण ठरविणार. त्यांनी 2019 ला मोडलेल्या शब्दाचा खुलासा आधी करावा. छ. संभाजीराजे आणि आमच्यातील विषय आहे, इतरांनी चोमडेपणा करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.