संजय राऊतांनी एखादा ढेकूण तरी मारला आहे का?; ‘या’ बंडखोर आमदाराचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेकवेळा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. त्यांच्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घेणाऱ्या राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक फोटो दाखवावा. त्यांनी कधी एखादा ढेकूण तरी मारला आहे का?,” असा सवाल शिरसाट यांनी केला आहे.

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्यावर संजय राऊतांनी काय काय टीका केली. आमच्या सोबतच्या चार महिलांना हे वेश्या म्हणतात, असे बोलणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील. कधीही झेंडा हातात न घेतलेले आता आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत. आम्ही ३२ वर्षे शिवसेनेत खूप चांगले काम केले आहे.

आम्ही लढून शिवसेना जनसामान्य लोकांच्यात पोहचवली आहे. आणि आज हे लोक आम्हाला बोलतात. आम्ही जेव्हा बंडखोरी केले. ते हा विचार किंवा चिंता केली नाही कि पुढे भविष्यात आमचे काय होईल. तरी या सत्तेत थांबण्यात काहीही अर्थ नव्हता, असेही यावेळी शिरसाट यांनी सांगितले.

Leave a Comment