शिंदे गटातील ‘संजय’ आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. कधी कधी माणसे बेईमान होतात मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, असेदेखील सुषमा अंधारे (sushma andhare) यावेळी म्हणाल्या. शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे पहिले आमदार असणार आहे असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. संजय शिरसाठ यांची ना मंत्रिपदात ना कार्यकारणीत वर्णिली लागली आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. शिंदे गटात जाऊन सर्वात जास्त पश्चाताप संजय शिरसाटांना होत असल्यामुळे ते लवकरच ठाकरे गटात येणार असल्याचे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. संभाजीनगरमध्ये अतुल सावे अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे यांना मंत्रिपद दिल्यामुळे संजय शिरसाठ यांची मंत्रिपदाची आशा मावळली आहे. त्यामुळे आता शिंदे गटातून कोणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दुसरीकडे, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांच्यात शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!