संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात – राम सातपुते 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या हेलिकॅप्टर अथवा विमानातून नेता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तर आषाढी एकादशी दिवशी संत भेटीची परंपरा अबाधित ठेवीत मानाच्या पालख्या एकादशीच्या आदल्या दिवशी वाहन अथवा एसटी द्वारे पंढरपूरला नेण्याची परवानगी देण्यात आली असून पुण्यातील चार पालख्यांचा यात समावेश असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले होते. त्यामुळे नेमक्या पालख्या कशा नेल्या जातील हा प्रश्न आहे. यावर आता राम सातपुते यांनी सरकारने दिला शब्द पाळून संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात अशी मागणी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरीची वारी वारकऱ्यांचे जीवन आहे तर पांडुरंग त्यांचा आत्मा आहे. मात्र कोरोनाचे वैश्विक संकट लक्षात घेऊन यंदाची वारी रद्द करून ३० जून रोजी विमान अथवा हेलिकॅप्टर ने मानाच्या पालख्या काही मोजक्या वारकऱ्यांसोबत पंढरपूरला नेल्या जातील. तरी वारकरी बंधूनी घरी राहून विठुरायाचे समरण करावे तसेच ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारीसाठी वारकऱ्यांना पास दिले होते ते रद्द करावेत असे सांगितले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला पालख्या वाहन अथवा एसटी द्वारे रवाना केल्या जाणार आहेत असे सांगितले आहे. तसेच नियोजन ही  सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. म्हणून आमदार राम सातपुते संतापले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द करण्याच्या निर्णयाला वारकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे सांगत माळशिरसचे आमदार रॅम सातपुते यांनी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांसमक्ष संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने नेऊ असे सांगितले होते. सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि या पालख्या हेलिकॅप्टरमधून न्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी आषाढी वारीचे रूपांतर संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये केले होते. तेव्हापासून विविध संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment