RSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात विजयादशमीला (dussehra festival) मोठे महत्व आहे. 1925 साली विजयादशमीच्याच (dussehra festival) दिवशी नागपूरमध्ये या संघटनेची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात सुरू केलेल्या संघटनेचा आज जगभर विस्तार झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राजकारणात येण्यापूर्वी या संघाचे प्रचारक होते.

नागपूरच्या उत्सवाला महत्त्व का?
संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील विजयादशमी (dussehra festival) उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. या दिवशी सरसंघचालक संघाची आगामी काळात वाटचाल कशी असेल याचे संकेत देत असतात. स्वयंसेवकांनी कोणत्या क्षेत्रात आगामी काळात कार्य करावं, संघ कार्यासमोरील आव्हानं, देशाच्या तसंच जागतिक क्षेत्रातील ताज्या घडामोडीवर संघाची अधिकृत भूमिका विजयादशमीच्या (dussehra festival) दिवशी होणाऱ्या भाषणामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्पष्ट करणार आहे.

संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार हि गोष्ट
संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या (dussehra festival) उत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून महिलेला निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे.

कोण आहेत संतोष यादव?
संतोष यादव या देशातील प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांचा जन्म 1969 साली हरियाणामध्ये झाला. त्यांनी मे 1993 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केले. त्यानंतर 1994 साली पुन्हा एकदा त्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे 2000 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर