यंदा आषाढी पायीवारी सोहळा रंगणार ; ‘या’ दिवशी होणार आळंदीतून प्रस्थान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या आषाढी वारीचा सोहळा आता रंगणार आहे. कारण आषाढीला दोन वर्षे एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी 21 जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक आज पार पडली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पायी वारीचा निर्णय घेण्यात ला. त्यास परवानगीही देण्यात आली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, तिथीची यंदा सोहळ्यात वृध्दी झाल्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार आहे. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही-शिक्क्याने वाहन पास दिले जाणार आहेत.

असा असणार पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

– मंगळवार, २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून प्रस्थान
– बुधवार, २२ व गुरुवार, २३ जून पुणे
– शुक्रवार, २४ व शनिवार, २५ जून सासवड
– रविवार २६ जून जेजुरी
– सोमवार, २७ जून वाल्हे
– मंगळवार, २८ व बुधवार २९ जून लोणंद
– गुरुवार, ३० जून तरडगांव
– शुक्रवार, १ व शनिवार, २ जुलै फलटण
– रविवार, ३ जुलै बरड
– सोमवार, ४ जुलै नातेपुते
– मंगळवार, ५ जुलै माळशिरस
– बुधवार, ६ जुलै वेळापूर,
– गुरुवार ७ जुलै भंडीशेगाव,
– शुक्रवार, ८ जुलै वाखरी
– शनिवार ९ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पालखी सोहळा मुक्कामी पोहचणार.
– रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.

Leave a Comment