सारंग पाटील आणि शशिकांत शिंदेंनी लुटला टेबल टेनिस खेळण्याचा आनंद (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अक्षय पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.सारंगबाबा पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन्ही नेत्यांचा हा टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या रूपातून खेळाप्रती त्यांची असलेली आवड आणि एकेमेकांबद्दलचे मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आज वाढे ता.सातारा येथे आदर्श एज्युकेशन संस्थेच्या केंब्रिज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा शुभारंभ आज संपन्न झाला. यावेळी दोन्ही नेत्यांनी खेळाचे मैदान, क्रिडा प्रकार व शाळेत घेण्यात येत असलेल्‍या विविध उपक्रमांची पाहणी करून माहिती घेतली. याच दरम्यान सारंग पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी टेबल टेनिसचा आनंद घेतला. सारंग पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर हा टेबल टेनिस खेळतानाच व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.facebook.com/Sarangpatilfc/videos/1990684547951327/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=xJqJ3l

दरम्यान, आदर्श एज्युकेशन संस्थेच्या केंब्रिज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीच्या शुभारंभाला संस्थेचे अध्यक्ष श्री.नरसिंगराव डिसले, श्री.श्रीमंतदादा झांजुरणे, श्री.बाळासाहेब फाळके, श्री.विठ्ठलराव गोळे, श्री.प्रशांत पवार, श्री.रमेश मोरे, श्री.अजय कदम, श्री.विलास शिंदे, श्री.विशाल जाधव, श्री.गणेश चव्हाण, श्री.केशव देशमुख, कु.चैतन्य डिसले अन्य मान्यवर, पालक, शिक्षक, संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.