सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव ; संबंधित शाळांना टाळे ठोकण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी दिलेल्या माहिती नुसार सातारा जिल्हापरिषदेच्या 16 शाळांमधील 35 विद्यार्थी हे कोरोनाबाधित सापडले असून या शाळांमधील सर्व विद्यार्थांची कोरोना तपासणी आता टप्या टप्याने केली जाणार आहे.

पाचवीते आठवीच्या वर्गातील 25 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून 9 ते 12 च्या वर्गातील 10 विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे तपासणीत उघडल झाले असून या सर्वांनवर वेळेत उपचार सुरु करण्यात आले आहेत, मात्र इतरही सर्व विद्यार्थांची तपासणी सुरु असल्याचेही शिक्षणाधिका-यांनी सांगितले आहे.

संबंधित शाळा 48 तास बंद ठेऊन त्या कालावधीत संपूर्ण शाळा सॅनिटाइझ करून घ्यावी आणि नंतर शाळा सुरू कराव्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या . दरम्यान या धक्कादायक महितीमुळे आता शाळा हे कोरोनाचे केंद्र बिंदू बनते की काय असे सध्या सर्वांना वाटू लागले आहेच शिवाय पालकवर्गातही आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group

Leave a Comment