सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा शहरासह सातारा तालुक्याच्या हद्दीतील दहा ग्रामपंचायत परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज (३० एप्रिल) रात्री १२ पासून पुढच्या आदेशापर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. कर्फ्यू काळात सदरील परिसरांत दोन पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखन्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हे पाऊल उचलले आहे.
सातारा शहरात आज कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणुन शहर आणि आसपासची गावे सील करण्यात आली आहेत. यामध्ये खेड ग्रामपंचायत, विलासपूर ग्रामपंचायत, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाडे, कोडोली, संभाजीनगर, सातारा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश आहे.
दरम्यान, कर्फ्यू काळात दवाखाने मेडीकल नर्सिंग होम वगळता सर्व दुकाने राहणार बंद राहणार आहेत. अत्यावश्यल सेवेतील कर्मचार्यांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यापुर्वी कराड शहर आणि परिसरातील ११ गावांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर जावळी आणि पाटन येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी कडक संचारबंदी लागू केली होती.
