औरंगाबाद | शिवाजीनगर रेल्वेगेट वरील वाहतुकीला शिस्त लावा. अशी मागणी सातारा देवळाई जनसेवा कृती समितीने पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त, वाहतूक शाखा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाहनधारक दररोज नियम मोडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
शिवाजीनगर बीड बायपासला जोडणाऱ्या रेल्वे गेटवर रेल्वे येणाऱ्या येण्या-जाण्याच्या वेळेवर वाहनधारकांची गेट बंद झाल्यावर खूप गर्दी होते. यावेळी भावांना दोन्ही बाजूने येऊन थांबतात. आणि जाण्यासाठी धावपळ होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. नोकरदार मंडळी तसेच पायी जाणाऱ्या येणाऱ्या महिला, नागरिकांना या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. एवढेच नाही तर रुग्णवाहिकेला देखील लवकर रस्ता मिळत नाही.
या वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी रॉंग साईड येऊन थांबणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच वाहतूक पोलिसांचे कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.