सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : कोरेगाव नगरपंचायतीवर आमदार महेश शिंदेंच्या पॅनलची सत्ता; शशिकांत शिंदेंना धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोरेगाव नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी मतमोजणी सुरुवात झाली असून पहिल्या नऊ जागा वरती मतमोजणी पार पडली. यामध्ये आठ जागावरती शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला आहे.

कोरेगाव नगर पंचायत निकाल हाती आला आहे. आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनल 9 पैकी 8 जागांवर विजयी मिळवला आहे. तर आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनल 9 पैकी 1 जागेवर विजयी मिळवला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यासाठी येथील लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या ठिकाणी एकूण 17 जागांसाठी मतमोजणी केली जात असून कोरेगाव नगर पंचायत निकाल हाती आला आहे. कोरेगावमध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 23 जागांसाठी मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यात एकूण 31 बूथवर सुमारे 17 हजार 168 मतदारांपैकी 13 हजार 818 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Comment