दिवसेनदिवस चिंतेत वाढ : जिल्ह्यात शुक्रवारी ३६५ कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. शुक्रवारी ३६५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३, १५९, २९३, ३७१, ४९५ तर शुक्रवारी ३६५ असा बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६४१०४ आकडा झाला. तर जिल्ह्यात एकूण ५९३०७ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १८९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात २५३९ उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like