सातारा जिल्ह्यातील ‘या’ शहरी भागात ऑनलाईन नोंदणी नंतरच होणार लसीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यात कोविड 19 लसीकरणाची मोहीम राबविलेली आहे. ऑनलाईन नोंदणी बंद केल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी थेट केंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली आहे. सातारा जिल्हात सर्वच शासकीय रुग्णालयात नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. परिणामी कोरोनाचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता लक्षात घेत आता आरोग्य विभागाने रविवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आता सातारा जिल्ह्यातील सातारासह कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागात कोविड 19 लसीकरण सत्र 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे.

जिल्हा आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयात कोविड 19 चा प्रादुर्गाव सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पातळीवरुन उपाययोजना केल्या जात आहेत. सातारा जिल्हयात कोविड 19 लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत जिल्हयात 9 लाख 82 हजार 273 एवढया लाभार्थीनी पहिला व दुसरा कोविड 19 लसीकरण डोस घेतला आहे.

सातारा जिल्हयातील संपूर्ण पात्र लाभार्थ्याचे नियोजनबध्द लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन योग्य नियोजन केले जात आहे. त्याचधर्तीवर सातारा, कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड 19 लसीकरण सत्र यापुढे 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी 12 वाजता लसीकरण सत्र https://selfregistration.comin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहे.

त्यामुळे यापुढे सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थीचे On the Spot पध्दतीने लसीकरण केले जाणार नाही. दि 13 जुलै पासून लस उपलब्धतेनुसार सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थीनी उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करुनच लसीकरण करणे आवश्यक आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र on the Spot पध्दतीने सुरु राहणार आहे.

Leave a Comment