Satara News : बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाच्या अंगावरुन गेलं चाक; त्यानंतर..
सातारा प्रतिनिधी (Satara News) : सध्या गावोगावी यात्रांचा मोहोल आहे. ग्रामिण भागात यात्रांच्यावेळी बैलगाडा शैर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. अशाच बोरखळ येथ भरकेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यु झाला आहे.
पुष्कर पवार असं या तरुणाचे नाव असून दोन बैलगाडीच्या धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीच चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे.
तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. या शर्यती साठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Satara News