सातारा सध्या अनलाॅक नाही : जिल्ह्यात नवे 821 कोरोना बाधित, पाॅझिटीव्ह रेट 6.98 टक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 821 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 885 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 757 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.98 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 368 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 8 हजार 591 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 95 हजार 74 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 14 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 14 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या अनलाॅकचा निर्णय नाही : पृथ्वीराज चव्हाण

सातारा जिल्ह्यात अनलाॅक पुढील आठवड्यापर्यंत पुढे गेलेला आहे.या आठवड्यात जिल्हा अनलाॅक संदर्भात आदेश निघणार नाही. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाॅझिटीव्ह रेट कमी असून केवळ कराड तालुक्यात बाधित जास्त आहेत. तेव्हा बाकींच्या तालुक्यांना सूट देण्यात यावी, मात्र असे केले जाणार नाही. सर्व जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट विचारात घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment