सातारा जिल्ह्यात दिवसभरात सापडले 130 नवीन कोरोनाग्रस्त; विद्यार्थीही कोरोनाग्रस्त आढळत असल्याने पालकांच्यात चिंता

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्याय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 130 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा अता 58 हजार 499 वर पोहोचला आहे.

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती पुढे आली आहे. या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी दिलेल्या माहिती नुसार सातारा जिल्हापरिषदेच्या 16 शाळांमधील 35 विद्यार्थी हे कोरोनाबाधित सापडले असून या शाळांमधील सर्व विद्यार्थांची कोरोना तपासणी आता टप्या टप्याने केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात नाईट कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे . ठिकठिकाणी निर्बंध घातले गेले आहेत.तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून ही चिंतेची बाब आहे.

दरम्याम, जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 55 हजार 464 आहे. तर आज दिवसभरात कोरोनाबधित मृत्यु -01 नोंदवला गेला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू 1 हजार 850 वर गेला आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 051 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group

You might also like