सातारा जिल्ह्यात आणखी ३ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या ९५ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी कराड येथे २ तर सातारा इथे १ असे एकुण ३ जणांचे कोविड १९ अहवाल पोझिटिव्ह आले आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-१९) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/

ताज्या आकडेवारीनुसार आता सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. यातील तब्बल ७२ कोरोनाग्रस्त हे एकट्या कराड तालुक्यात आहेत. मागील काही दिवसांत रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. कराड तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला असून रुग्णांच्या संख्यात वाढ सुरुच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सर्व सहा कोरोना रुग्णांना काल दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जावळी तालुका कोरोना मुक्त झाला आहे. मात्र कराड तालुक्यातील रुग्णांची संख्या थांबायचे नाव घेत नसल्याने जिल्हा प्रशासनालाही घाम फुटला आहे. 

२३ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील १ व उपजिल्हा रुग्णालय,फलटण येथील १० असे एकूण २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

१३० जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
६ मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 102, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे २१ असे एकूण १३० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- ७९, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- १४, कोरोना बाधित मृत्यु- २ तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- ९५इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment