कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहत याचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले कि, “या प्रकल्पासाठी मी १९९५ पासून प्रयत्न करीत होतो. त्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. आता या कामाला प्रत्यक्ष सुरवात होतेय, याचे आज खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मल्हारपेठला पोलीस आउटपोस्टचे दर्जाउन्नतीकरण करून या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे यासाठी मी १९९५ सालापासून प्रयत्न करीत होतो. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. मी या पोलिस स्टेशनच्या दर्जाउन्नतीसाठी सतत पाठपुरावा केला. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारमध्ये विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनची व पोलीस वसाहतीच्या इमारतीसाठी तत्काळ मान्यता मिळाली. मी लगेच पोलीस स्टेशनची इमारत, अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असा १९ ते २० कोटीचा संयुक्त प्रकल्प आपण मंजूर करून घेतला. त्या प्रकल्पाचे टेंडरही निघाले. आता या कामाला प्रत्यक्ष सुरवात होतेय, याच आज खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, पाटण हा डोंगराला व दुर्गम भाग आहे. या परिसरात मल्हारपेठ पोलीस स्टेशन कि ज्याची मान्यता सहकारी शंभूराज देसाई यांनी घेतली. आणि या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन स्थापन झाले. अलीकडच्या काळात आपण पाहतोय कि पोलिसांच्या राहण्याच्या अडचणी या येत असतात. ज्या जुन्या वसाहती आहेत त्या कालबाहय झाल्या आहेत. आणि त्या पार्शवभूमीवर या ठिकाणी साडे एकोणीस कोटींचा हा प्रकल्प उभा केलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ५६ लोकांची राहण्याची सोया झालेली आहे. निश्चित या परिसरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल.