खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती; सापडलेल्या वस्तू पाहून तुम्हीही चक्रवाल

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेक दिवसापासून ऐकत आहोत कि बीडचा बिहार झालाय . सगळ्यात भयानक घटना म्हणजे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली. त्या संदर्भातील व्हिडीओ अन फोटो आख्या महाराष्ट्राने पाहिला . या घटनेतील सर्वात मोठा गुन्हेगार म्हणजे वाल्मिकी कराड असून, त्याला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेतून अजून बीड सावरला नाही , तितक्यात नवीन वाल्मिकी कराड समोर येतो, तो म्हणजे सतीश (खोक्या) भोसले. या सतीश भोसलेने दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केली होती, त्याचा हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला . पण सतीश भोसलेंचा हा एकमेव कारनामा नसून, त्यांचे अनेक भयानक कारनामे उघडकीस येत आहेत. 8 मार्च रोजी पोलिसानी त्याच्या घराची झडती घेतली अन त्यांना एक घबाड सापडलं , तर ते घबाड नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

हरणांची शिकार करून त्यांचे मास खाल्ले –

हा सतीश भोसले (Satish Bhosale) कोणी सामान्य माणूस नसून , भाजप पदाधिकारी व आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. गेल्या काही दिवसापासून पोलीस त्याच्या अटकेच्या प्रयत्नात होते, पण तो हाती लागत नव्हता. पण आता पोलिसाना एक माहिती मिळाली कि , या सतीश भोसलेने हरणांची शिकार करून त्यांचे मास खाल्ले आहे. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन , त्याचा पुढील तपास सुरु केला आहे.

वन्यजीवांच्या शिकारीचे मोठं घबाड –

झडतीसाठी अखेर पोलीस सतीश भोसलेच्या घरी पोहचतात , घराची झडती घेतली जाते. अन त्यांना वन्यजीवांच्या शिकारीचे मोठं घबाड सापडत. यामध्ये वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांससह धारदार शस्त्र, जाळी, वाघुर आणि बरच काही सापडलेले आहे. या संपूर्ण प्रकरणासाठी जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हि धाड टाकली असता , तपासामध्ये त्यांना मोर आणि हरिण मारणारे जाळे सापडले.