मिर्झापूरचे सौरभ पांडे तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक सेवा आयोगाचे सिव्हिल सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मिर्झापूर मधील सौरभ पांडे यांनी ६६ वा रँक मिळविला आहे. त्यांचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये व्यवस्थापक पदावर काम करत आहेत. सौरभ यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्य परीक्षा पास केली होती. वडिलांचे सहकार्य आणि कठोर मेहनत यामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात. तसेच दैनंदिन घडामोडींसाठी रोज वर्तमानपत्र वाचत असल्याचेही ते सांगतात.  

यावर्षी एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ३०४ खुला प्रवर्ग, ७८ ईडब्ल्यूएस, २५१ ओबीसी, १२९ एससी आणि ६७ एसटी प्रवर्गातून निवडले आहेत. आयोगानुसार  परीक्षार्थींचे गुण १५ दिवसांनी जाहीर केले जाणार आहेत. १८२ उमेदवारांना रिझर्व्ह यादीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये ९१ खुले, ९ ईडब्ल्यूएस, ७१ ओबीसी, ८ एससी, ३ एसटी प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. ११ उमेदवारांचा निकाल होल्डवर आहे. 

कोरोना संक्रमणामुळे यावर्षी मुलाखती स्थगित करण्यात आल्या होत्या. यूपीएससी मध्ये एकूण २३०४ उमेदवार यशस्वी झाले होते. १७ फेब्रुवारीपासून मुलाखत प्रक्रिया सुरु झाली होती मात्र संचारबंदीमुळे ती स्थगित करण्यात आली होती. नंतर २० जुलै ते ३० जुलै दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment