गांधी विचार परिषद बंद करण्यास माजी विद्यार्थ्यांचा विरोध

वर्धा, प्रतिनिधी । वर्धा स्थित गांधी विचार परिषद बंद करू नये यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आज वर्ध्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आपला विरोध प्रकट केला. गांधी विचार परिषद ही एक नामांकित संस्था असून गांधी विचारांचे संवर्धन आणि प्रसाराकरीता जगभरात ओळखल्या जाते. इथे गांधी विचारांवर एक वर्षाचा निवासी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. विश्वस्त मंडळाने यावर्षीपासून संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज विद्यार्थ्यांनी वर्धा येथील गांधी विचार परिषद, डाॅ. आंबेडकर पुतळा आणि सेवाग्राम आश्रमातील मुख्य प्रवेशद्वारा समोर आयोजित निषेध सभेत सहभागी होत #SaveIGSwardha असे लिहिलेले पोस्टर्स दाखवत विरोध नोंदवला.

Untitled design - 2020-07-24T234250.727

जगभरात पसरलेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्याकडून मागील १० दिवसांपासून संस्थेच्या बचावार्थ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य समाजमाध्यमांवर मोहीम चालविल्या जात आहे. जोपर्यंत गांधी विचार परिषदेचे विश्वस्त ही संस्था पुर्वीच्या स्वरुपात पुन्हा सुरू होईल, असे लिखीत आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हा लढा चालू राहील असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.यावर्षी कोरोनाचे कारण देत संस्थेतला पदविका अभ्यासक्रम स्थगित करण्यात आला तर मग त्याच ठिकाणी इतर संस्थाच्या विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी कशी दिल्या जात आहे? इतर संस्थाच्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही का? असाही प्रश्न परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. गांधी विचार परिषदेच्या भविष्याच्या दृष्टीने असले प्रकार धोकादायक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Untitled design - 2020-07-24T234115.410

गांधी विचार परिषदेचे संचालक पडद्याआडून या संस्थेची सूत्रे इतरांच्या हाती सोपविण्यात मग्न आहेत. गांधी विचार परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुक्तीवर इतरत्र बदल्या करण्यात आल्या असून याआधी त्यांच्यावर नोकरीचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. सध्या या संस्थेतील दैनंदिन कामकाजही बंद आहे.या सर्व घडामोडी पाहता अशी शंका व्यक्त केल्या जात आहे कि, येथील कर्मचा-यांच्या बदल्या करत संस्थेचे काम बंद करुन परिषदेची जागा आणि इमारती इतर संस्थाकडे सोपविल्या जात आहे. संस्थेचे संचालक श्री. महोदय इतर संस्थाशी संगनमत करुन गांधी विचार परिषद गिळंकृत करण्याचा डाव रचल्याचा आरोपही माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासाठीचे पुरावे म्हणून समाजमाध्यमात संचालकांचे पत्रेही विद्यार्थ्यांद्वारा व्हायरल केल्या गेले. दरम्यान, गांधी विचार परिषदचे संचालक श्री. भरत महोदय यांना या संदर्भात विचारलं असता त्यांना कुठलेही ठोस कारण किंवा स्पष्ट उत्तर देता आले नाही.

Untitled design - 2020-07-24T234408.545

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like