- Advertisement -
औरंगाबाद : ऑफीसमध्ये तुझे लफडे असून मला तुझ्यात रस नाही असे म्हणत, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने पत्नीस बेदम मारहाण करून तिचे डोके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घटना 1 जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सदर घटना जिल्हा कोर्टाच्या पाठीमागील समाधान कॉलनीत असलेल्या सावली अपार्टमेंन्टमध्ये घडली. वैभव कृष्णराव जोशी (वय ३२) रा.सावली अपार्टमेंन्ट, समाधान कॉलनी असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. वैभवने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली होती.
- Advertisement -
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.