SBI खातेदार आता आपला मोबाइल नंबर घरबसल्या बदलू शकतील, त्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) च्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. आपण देखील आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर (change registered mobile number) बदलू इच्छित असल्यास आता आपण हे अगदी सहजपणे करू शकता. SBI आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने मोबाईल नंबर बदलू देते. आज आम्ही आपल्याला घरबसल्या मोबाइल नंबर सहजपणे कसा बदलू शकतो हे सांगणार आहोत-

मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला एटीएम-डेबिट-कार्डसह एक्टिवेटेड मोबाइल नंबरची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ओटीपीद्वारे देखील बदलू शकता.

रजिस्टर्ड मोबाइल नंबर कसा बदलायचा (how SBI account holders can change registered mobile number online) –

>> तुम्हाला पहिले SBI च्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

>> डावीकडील नेव्हिगेशन मेन्यूमधून ‘My Accounts and Profile’ वर क्लिक करा.

>> आता ड्रॉप डाऊन मेन्यू मधील ‘Profile’ या पर्यायावर क्लिक करा.

>> पर्सनल डिटेल्स / मोबाइल वर क्लिक करा.

>> आता प्रोफाइल पासवर्ड एंटर करा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

>> यानंतर, ‘Change Mobile Number-Domestic only (Through OTP/ATM/Contact Centre)’ पर्यायावर क्लिक करा.

>> आता एक नवीन पेज उघडेल.

>> येथे आपण आपल्या समोर ‘Personal Details-Mobile Number Update’ लिहून येईल.

>> आता तुमचा मोबाइल नंबर एंटर करा. यानंतर, आपला मोबाइल नंबर पुन्हा एंटर करा. सबमिट बटणावर क्लिक करा.

>> आता एक पॉप-अप मेसेज येईल. या मेसेज ‘Verify and confirm your mobile number xxxxxxxxxx’ वर क्लिक करा.

>> आता “OK” वर क्लिक करा.

>> यानंतर, आपल्या स्क्रीनवर तीन पर्याय असतील – दोन्ही मोबाईल क्रमांकावर ओटीपी द्वारे, इंटरनेट बँकिंग रिक्वेस्ट अप्रुवल थ्रू एटीएम आणि अप्रुवल थ्रू कॉन्टॅक्ट सेंटर.

>> आपण दोन्ही नंबरवर मिळालेल्या ओटीपीद्वारे घरबसल्या आपला मोबाइल नंबर चेंज करू शकता.

मोबाइल नंबर ऑफलाइन कसा चेंज करावा ?
याशिवाय बँकेच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला तेथे यासाठीचा अर्ज मिळेल. यासह, आपल्याला आपले ओळखपत्र द्यावे लागेल. या फॉर्ममध्ये आपल्याला सर्व डिटेल्स भरावे लागेल आणि बँकेत जमा करावे लागेल, त्यानंतर आपला मोबाइल नंबर काही दिवसांत रजिस्टर्ड होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment