SBI ने दिली ज्येष्ठ नागरिकांना भेट, आता 31 डिसेंबरपर्यंत ‘या’ योजनेत करू शकाल गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. मे महिन्यात बँकेने SBI ‘वीकेअर’ सीनियर सिटीजन्स टर्म डिपॉझिट स्कीम (SBI ‘WECARE’ Senior Citizens’ Term Deposit scheme) जाहीर केली. सध्या घसरत जाणारे व्याज दर पाहता ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. येत्या वर्षाच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम उपलब्ध होईल. यापूर्वी बॅंकने 30 सप्टेंबरपर्यंत ही योजना वैध असल्याचे जाहीर केले होते.

ही योजना काय आहे?
SBI च्या या नव्या योजनेत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीच्या डिपॉझिटवर (FD) 30 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त प्रीमियम व्याज देण्यात येईल. ही योजना फक्त 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असेल. केवळ या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या ग्राहकांना योग्य कालावधीत लाभ मिळेल.

कोण गुंतवणूक करू शकेल ?
60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे. त्याचबरोबर योजनेतील जास्तीत जास्त डिपॉझिट रक्कम 2 कोटींपेक्षा कमी आहे. या SBI Wecare डिपॉझिटमध्ये, मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढताना अतिरिक्त व्याज दिले जात नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय स्पेशल FD स्कीम व्याज दर
ज्येष्ठ नागरिकाला रिटेल टर्म डिपॉझिटवर 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत सामान्य लोकांना 0.50% अधिक व्याज मिळेल. 5 वर्षांपेक्षा जास्त रिटेल टर्म डिपॉझिटवर 0.80% व्याज मिळेल, त्यासह अतिरिक्त 0.30% पण सामील असेल. SBI Wecare डिपॉझिट योजनेचा लाभ 31 डिसेंबर 2020 पर्यंत मिळू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like