SBI महिलांसाठी कमी व्याजदरावर देत आहे स्वस्त होमलोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन देत आहे. SBI च्या म्हणण्यानुसार, जर लोन घेणारी महिला असेल तर ती इतर फायद्यांव्यतिरिक्त सवलतींचा लाभ देखील घेऊ शकते. म्हणजे तिला कमी व्याजदराने लोन मिळेल. हे होम लोन क्रेडिट स्कोअरशी जोडलेले आहे. याचा अर्थ तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितकी कर्जाची रक्कम जास्त असेल.

SBI ने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. बँकेने आपल्या अधिकृत हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, SBI होम लोनसह तुमचे स्वप्नातील घर मिळवा. 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोकं लोन घेऊ शकतात. SBI च्या नियमित होम लोनमध्ये Flexipay, NRI होम लोन, नॉन-सॅलराइड लोन, डिफरेंशियल ऑफरिंग, प्रिव्हिलेज, शौर्य आणि अपना घर यांचा समावेश होतो.

‘या’ अटी आहेत
रहिवासी: भारतीय
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 70 वर्षे
कर्जाचा कालावधी: 30 वर्षे

नवीन व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया वार्षिक 6.65 टक्के दराने होम लोन देत आहे.

असे फायदे आहेत
होम लोन प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करतात. त्याचे अनेक फायदे आहेत
>> कमी व्याजदर
>> कमी प्रोसेसिंग फीस
>> इनडायरेक्ट फीस नाही
>> प्रीपेमेंट फीस नाही
>> कोणतेही छुपे शुल्क नाही
>> कर्जाची परतफेड 30 वर्षांपर्यंत करता येते
>> होम लोन ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपातही उपलब्ध आहे
>> महिला घर खरेदी करणाऱ्यांसाठी व्याजदर कमी असेल

Leave a Comment