SBI ने शेतकऱ्यांकडून भेट – आता घरबसल्या करू शकतील KCC खात्यासंदर्भातील ‘ही’ सर्व कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया मोदी सरकारने आता अत्यंत सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे खत, बियाणे इत्यादींसाठी सहज कर्ज मिळू शकते. यात 9 टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे. सरकार या कार्डाद्वारे 2 टक्के अनुदान देते. याद्वारे जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर परत केले तर त्यांना 3 टक्के अधिकची सूट मिळते. एकंदरीत कर्जाची वेळेवर परतफेड केल्यावर शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्ज मिळते.

KCC खात्याविषयी सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी प्रथम तुम्हाला SBIYONO हे अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे. योनो अॅपवर लॉग इन केल्यानंतर, शेतकर्‍यांना YONO Krishi platform वर क्लिक करावे लागेल. येथे अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, KCC Review हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या KCC खात्याविषयी सर्व माहिती मिळेल.

KCC खात्यात असलेल्या क्रेडिट बॅलेन्सवर बचत बँकेच्या दराने व्याज दिले जाते. सर्व KCC खातेदारांना फ्री एटीएम डेबिट कार्डे दिली जातात आणि तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शेतकर्‍यांना वर्षाकाठी 2% सूट मिळते. जी लोकं वेळेवर कर्ज फेडतात त्यांना वर्षाकाठी 3% दराने जादा व्याजाची सूट मिळते.

सर्व शेतकरी किंवा शेतीमध्ये गुंतलेले लोक हे KCC खाते उघडू शकतात. पट्टे किंवा जमीन कसायला घेऊन शेती करणारे शेतकरीही हे KCC खाते देखील उघडू शकतात. भाडेकरू शेतकरी बचत गटांच्या माध्यमातूनही हे खाते उघडू शकतात.

यासाठी अर्ज करण्यासाठी मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. ऍड्रेस प्रूफ म्हणून इ. डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like