धनुष्यबाण नक्की कोणाचा? कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या ‘या’ सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षांवर पुढील सुनावणी ८ ऑगस्टला पार पडणार आहे. आज दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी ढकलली. तसेच जोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे तुर्तास शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

आम्ही जर अपात्र ठरलो तर पुढील निवडणुकीसाठी आम्ही पक्षाचे चिन्ह वापरू शकतो का असा सवाल शिंदे गटाचे वकील अभिषेक साळवे यांनी केला. त्यावर बोलताना निवडणूक आयोगाचे अरविंद दातार म्हणाले की, चिन्ह कोणाकडे जाईल हे निवडणूक आयोग ठरवते. विधीमंडळातील घडामोडींच्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही असा युक्तिवाद अरविंद दातार यांनी केला . या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश  निवडणूक आयोगाला दिले. जोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत निवणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, तसेच पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये अशा सूचना कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या .

दरम्यान, आज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बाजूनी सुनावणी ऐकल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी ढकलली आहे. तसेच हे प्रकरण ५ सदस्यीय घटना पिठाकडे जाणार का ?? हे सुद्धा सोमवारीच स्पष्ट होईल. लिखित युक्तीवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे न्यायालयानं सांगितले.