बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी स्वीकारले जाणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. “बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून बारावी परीक्षेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इ. 12 वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे दि. 12 नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in येथे घेतले जातील.”

बारावी परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असे मंत्री गायकवाड यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment