टीम, HELLO महाराष्ट्र । खरंतर स्कुबा डायव्हिंग हा एक असा अनुभव आहे जो प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी घ्यायला हवा . क्सुबा डायव्हिंग विषयी अनेक जण उत्सुक असतात पण तेव्हडेच घाबरलेहि असतात . अर्थात भीती हि माहिती नसल्यामुळेच असते . त्यामुळे आज आपण क्सुबा डायव्हिंग कोणी करावे आणि कोणाला करत येत नाही याविषयी माहिती घेऊयात .
१. सर्वात पहिली भीती हि प्रत्येकाला असते ती पाण्याची , समुद्राच्या खोलीची … तर मी सांगू इच्छिते कि , स्कुबा डायव्हिंग हि कमीत कमी २० फूट खोल समुद्रात करावे लागते . तरच हा सुंदर अनुभव तुम्ही परिपूर्ण पद्धतीने अनुभवू शकता . आता घाबरायची गरज अजिबात नसते . कारण स्कुबा करताना तुम्ही एकटे नसता . ते २० मी. तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कोच असतोच . हे कोच वेल ट्रेन्ड असतात आणि एक्सपेरिअन्सड असतात .
२. स्कुबा करताना आता दुसरी भीती वाटते ती श्वास कसा घेणार याची … तर काळजी करू नका . तुम्ही जसा सहज श्वास जमिनीवर घेता , तसाच श्वास पाण्याखाली घेता येतो . यासाठी वापरले जाणारे प्रोफेशनल इक्विपमेंट्स जसे ऑक्सिजन सिलेंडर आणि वजन आपल्याला दिले जातात . जे पाण्यात उतरण्यापूर्वी आपल्याला घातले जातात . आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते .
३. आता वेळ प्रत्यक्षात समुद्रात उतरण्याची . तुम्हाला एकदा ऑक्सिजन मास्क , वजन , सिलेंडर चढवले कि मी बोटीवरून तुम्हाला तुमचा कोच समुद्रात नेतो . तुम्हाला लावलेले जाकेट तुम्हाला बुडू देणार नाही . निर्धास्त पाण्यात उतारा . स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नितळ समुद्रतळाचे अंदाज घेऊन तुम्हाला तिथपर्यंत नेले जाईल .
४. आता येतो सर्वात महत्वाचा भाग . पाण्यात तुम्हाला श्वास हा तोंडाने घ्यायचा असतो . तुमच्या नाकात पाणी जाणार नाही , काळजी करू नका . खूप सहज तुमच्या ते लक्षात येईल . दुसरे महत्वाचे असते ते म्हणजे अंडर वॉटर साइन . पाण्यात गेल्यानंतर तुम्हाला बोलता येत नाही . त्यासाठी तुम्हाला साइन शिकवले जातील .
५ . हे साइन्स तुम्हाला अंडर वॉटर तुमच्या कोच सोबत बोलायला तुम्हाला मदत करतील . जर काही अडथळा वाटलं आणि तुम्हाला वर यायचे असें तर थम्स उप , रेडी असाल आणि सगळं सुरळीत हे असे सांगण्यासाठी तर्जनी आणि अंगठा जोडून छान असा साइन द्या . आणि जर काही समस्या असेल तर थंब डाऊन करा .
६. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल कि मला तर पोहोत येत नाही तर मग मी कसे पाण्यात उतरू … तर अभिनंदन कारण जर पोहोता येत नसेन तर तुम्ही स्कुबाचा अनुभव अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल . आता तुम्ही म्हणाल कि ते कसे , तर स्कुबा म्हणजे तुम्हाला पाण्यात बुडायचे आहे . आणि ज्यांना पोहोता येते ते पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात . आणि कदाचित थोडा वेळ लागतो .
७. आता पाण्यात खाली जातं असताना जसा समुद्राचा तळ दिसायला लागतो तसे लक्षात ठेवा तुमच्या त्या दगडांवर चालायचे नाहीये . तर शरीर पूर्ण झोकून द्यायचे आहे . पालथे जसे आपण झोपतो तसे दगडांवर झोपायचे आहे . तुमची हालचाल तोंडी शांत झाली कि ज्या क्षणासाठी तुम्ही हे धाडस करत आहेत ते सध्या होते . आणि रंगबिरंगी लहान मोठे मासे तुमच्याशी खेळायला लागतात . समद्राखालचे ते सुंदर जग तुम्हाला अनुभवता येते . बोटीवरून उतरण्यापासून ते पुन्हा बोटीवर आणून सोडेपर्यंत तुमचा कोच तुमच्या सोबत असतो .
८ . अ . स्कुबा डायव्हिंग कोण करू शकते ? – कोणीही
ब . स्कुबा डायव्हिंग कोण करू शकत नाही – गर्भवती माता
क . वयाचे काही बंधन – बंधन असे नाही परंतु लहान मुलांचे वय १५ च्या वर असल्यास चांगले .
ड . कुठे करता येते – महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किल्याच्या पायथ्याला तारकर्ली मध्ये किंवा गोवा मध्ये करता येईल इ . किती खर्च येतो – ६०० ते २००० पर्यंत .
९ . अंडर वॉटर तुमचा कोच तुमचा व्हिडीओ आणि फोटो देखील घेतो , जे आयुष्यभर तुमच्या अनुभवांना उजाळा देतात . तर मग काय विचार करताय ? गेली का नाही भीती ? मग मला नक्की कळवा कधी प्लॅन करताय स्कुबा करण्यासाठी कोकण गाठायचा ? आणि नक्की शेअर करा माहिती कशी वाटली आणि उपयुक्त वाटली का , तुमच्या अनुभवासह….