सेबीच्या ‘या’ निर्णयामुळे छोट्या गुंतवणूकदारांना आता UPI द्वारे जास्त पैसे गुंतवता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा देत UPI च्या माध्यमातून डेट सिक्योरिटीजमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. रिटेल गुंतवणूकदार आता UPI द्वारे डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतील. आतापर्यंत ही मर्यादा दोन लाख रुपये होती.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की,” ही नवीन तरतूद 1 मे 2022 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या डेट सिक्योरिटीजच्या पब्लिक इश्यूवर लागू होईल. SEBI च्या सध्याच्या नियमांनुसार, गुंतवणूकदारांना UPI सिस्टीमद्वारे डेट सिक्योरिटीजच्या इश्यूमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. या बदलानंतर ही मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढणार आहे.

नवीन बदलांमुळे तरतुदींमध्ये समानता येईल
भागधारकांशी झालेल्या चर्चेच्या आधारे तरतुदींमध्ये समानता आणण्यासाठी SEBI ने UPI कडून गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे इन्स्टंट पेमेंट सिस्टीम UPI डेव्हलप केली गेली आहे. याच्या मदतीने एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते.

सेबी दोन कंपन्यांच्या 46 मालमत्तांचा लिलाव करणार आहे
सेबी 6 एप्रिल रोजी रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक इनच्या 46 मालमत्तांचा लिलाव करणार आहे. राखीव किंमत 97 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या कंपन्यांनी जमा केलेले हजारो कोटी वसूल करण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे. सेबीचे म्हणणे आहे की,”लिलाव होणार्‍या मालमत्तेमध्ये कार्यालय परिसर, निवासी सदनिका, जमीन आणि महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दादरा आणि नगर हवेली येथील दुकाने यांचा समावेश आहे.”

Leave a Comment