Wednesday, March 29, 2023

मोठी बातमी! कोरोनाच्या उद्रेकामुळं मुंबईत १५ जुलैपर्यंत कर्फ्यू लागू

- Advertisement -

मुंबई । ‘मिशन बिगीन’ अंतर्गत राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसंच प्रामुख्यानं मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत १४४ कलम अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे. या निर्णयामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. दरम्यान, ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, पूर्वीप्रमाणेच मुंबईत रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ २ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

- Advertisement -

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालही सुरू करण्यात आली होती. तसंच सुट दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दीही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”