नक्की पहा ः ममता दिदींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी कोण आहेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळविला आहे. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची निवडणूक झाली होती. यामध्ये ममता बॅनर्जींचा यांचा सुवेंदू अधिकारी 1 हजार 957 मतांनी पराभव केला आहे. तेव्हा नक्की सुवेंदू अधिकारी हे कोण आहेत, हे नक्की जाणूया.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी ?

ममता बॅनर्जी यांचेच पूर्वी जवळचे सहकारी असणारे सुवेंदू अधिकारी वाहतूक मंत्री होते. निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी नंदीग्राममध्ये एक जनसभा घेतली. त्यामध्ये ते तृणमूल काॅंग्रेसवर नाराज असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. अखेर डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

राजकारणातील प्रवास 

सुवेंदू अधिकारी यांचे कुटुंबीय मूळचे काँग्रेसचे. १९९८ साली सुवेंदू यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पूर्वमिदानापोरमध्ये त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव आहे. सुवेंदू यांचे वडिल सीसर अधिकारी यांनी तीन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली ते ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. सुवेंदू स्वत:हा दोनदा खासदार होते. सुवेंदू यांनी २००७ मध्ये नंदीग्राममध्ये जमीन अधिग्रहण विरोधी चळवळीचे नेतृत्व केले. याच आंदोलनामुळे २०११ साली तृणमुल काँग्रेसला ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांना सत्तेतून खाली खेचता आले.

वाहतूक मंत्री

२००९ साली सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमचे वजनदार नेते लक्ष्मण सेठ यांचा तब्बल १.७२ लाख मतांनी पराभव केला. २०१४ साली त्यांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली. २०१६ मध्ये त्यांनी नंदीग्राममधुन विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यांना वाहतूक मंत्री बनवण्यात आले. सप्टेंबर २०१४ मध्ये सीबीआयने सारदा चीट फंड घोटाळ्यात सुवेंदू अधिकारी यांची चौकशी केली. तर 2 मे 2021 मध्ये नंदीग्राम मतदार संघातून तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅंनर्जी यांचा पराभव करणारे जायंट क्लिअर हे सुवेंदू अधिकारी आहेत.

Leave a Comment