Monday, March 20, 2023

चहलला शुभेच्छा देताना सेहवागने वापरला चक्क मोदींचा फोटो

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग क्रिकेट मधील निवृत्ती नंतरही शोशलं नेटवर्किंग वर नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.सेहवाग ट्विटर वर नेहमीच ऍक्टिव्ह असतो आणि आपल्या भन्नाट ट्विट्स ने चाहत्यांच मनोरंजन करत असतो .आता त्याने भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चाहल आणि धनश्रीला साखरपुड्याच्या हटके शुभेच्छा देताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटो चा वापर केला आहे. मोदींच्या एका भाषणात मोदी म्हणाले होते की संकटकाळातदेखील आपण सकारात्मक संधी शोधायला हव्या. मोदींचा हाच संदेश विनोदी पद्धतीने वापरत सेहवागने चहल-धनश्रीला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत नुकताच साखरपुडा झाला.लवकरच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.

धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला.