PLI स्कीमसाठी ‘या’ मोठ्या कार कंपन्यांची निवड; जाणून घ्या ग्राहकांना कसा होणार फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I भारत सरकारने शुक्रवारी ऑटो कंपोनंट प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) स्कीमसाठी 70 हून जास्त कंपन्यांची निवड केली आहे. PLI स्कीमसाठी निवडलेल्या या कंपन्यांच्या लिस्टमध्ये मारुती सुझुकी, टोयोटा कॉम्पोनंट्स, डेल्फी टीव्हीएस, हेला इंडिया, दाना ग्रुप, बॉश, मिंडा इंडस्ट्रीज, टाटा ऑटो कॉम्पोनंट्स, भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे.

CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, सरकारने या स्कीमसाठी जर्मनी, अमेरिका, नेदरलँड, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि इटलीमधील अनेक कंपन्यांची निवड केली गेली आहे. चॅम्पियन कॉम्पोनंट्स स्कीमअंतर्गत 103 ऑटो कॉम्पोनंट्ससाठी ही निवड करण्यात आली आहे.

ऑटो कॉम्पोनंट्स PLI स्कीमअंतर्गत निवडलेल्या कॉम्पोनंट्स पैकी सुमारे 8 ते 13 टक्के कॉम्पोनंट्स हे सेफ्टी आयटम, फ्लेक्स फ्यूल,, CNG, LNG, इमिशन कंट्रोल डिव्हाइसेज, प्रवाशांची सोय, इंधनाची कार्यक्षमता वाढवणारे कॉम्पोनंट्स आणि सेन्सरशी संबंधित आहेत. यातील 13 -18 टक्के कॉम्पोनंट्स हायड्रोजन आणि इलेक्ट्रिकल वाहनांशी संबंधित आहेत.

याआधी, कॉर्मस अँड इंडस्ट्री मिनिस्टर पीयूष गोयल यांनी 7 मार्च रोजी सांगितले होते की, भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि शाश्वत विकास मार्गावर पुढे जाण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा आणि PLI योजनेसारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 11 फेब्रुवारी 2022 रोजी, सरकारने ऑटो मोबाइल आणि ऑटो मोबाइल कॉम्पोनंट्स इंडस्ट्री साठी चॅम्पियन OEM इन्सेन्टिव्ह स्कीम अंतर्गत 12 अर्जदारांच्या PLI स्कीमच्या एप्लिकेशनला मान्यता दिली होती. यामध्ये फोर्ड, टाटा मोटर्स, सुझुकी, ह्युंदाई, किया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या एप्लिकेशनचा समावेश होता.

PLI स्कीम बाबत बोलताना, 14 फेब्रुवारी रोजी भारत सरकारच्या एका उच्च अधिकार्‍याने सांगितले होते की, ऑटो मोबाइल आणि ऑटो कॉम्पोनंट्स सेक्टरसाठी PLI योजना देशात 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे पुढील 5 वर्षांत 2,31,500 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन शक्य होणार आहे. 09 जानेवारी 2022 पर्यंत, 115 कंपन्यांनी ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट्स सेक्टरच्या PLI स्कीमसाठी अर्ज दाखल केले होते. PLI स्कीमशी संबंधित नोटिफिकेशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी करण्यात आली होती.

Leave a Comment