स्वतंत्र सांगलीसाठी शिवसेनेची जोरदार निदर्शने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मिरज तालुक्याचे विभाजन करून सांगली स्वतंत्र तालुका करावा आणि महापालिकेतील आयुक्तांनी केलेल्या प्रभारी पदोन्नतीची चौकशी करून आयुक्तांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज शिवसेना महिला आघाडी सांगली शहरच्यावतीने महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी शहा यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील स्टेशन चौकामध्ये रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

सांगली पश्चिम आणि मिरज पूर्व भागाचा मिळून एक तालुका आहे. सांगली आणि आसपासच्या गावातील लोकांना कामासाठी तहसीलदार कार्यालय मिरज येथे सारखे हेलपाटे मारावे लागतात. यासाठी स्वतंत्र सांगली तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तसेच महापालिका आयुक्त खेबुडकर यांनी बेकायदा प्रभारी पदोन्नती स्वतःच्या अधिकारात कनिष्ठ लीपिकास सहाय्यक आयुक्त पदी लायक नसताना केवळ आणि केवळ आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती बेकायदा दिली आहे.
याची चौकशी झाली पाहिजे व सांगली तालुका करतो म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकर ऐकत आहेत पण त्याची अंमबजावणी होत नाही सदरचा सांगली तालुका झालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या सांगली शहराच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
यावेळी मानसी शहा, सुजाता इंगळे. पूजा मुळके, सप्नाली कुरळपकर, सुनीता मोरे, सुनीता पाटील, राधिका जयस्वाल, मुमताज मुजावर, दीपा इंगळे, संगीता जाधव, माया पवार, निता पवार, अनिल शेटे, जितेंद्र शहा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Comment