कौतुकास्पद !! कोरोनग्रस्तांसाठी शाहरूखने ऑफिसचे रूपांतर केले आयसीयूमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सरकारपासून गरजू पर्यंत खूप मदत केली. कलाकारांनी लोकांना थेट पैसे देण्याशिवाय अनेक मार्गांनी मदत केली आहे. किंग खान शाहरूख खाननेसुद्धा क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी आपले कार्यालय बीएमसीला दिले होते. शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या या मदतीचे खूप कौतुक झाले आणि मुंबईतील खार येथील कार्यालयात क्वारंटाइन सेंटर
दिल्याबद्दल बीएमसीनेही शाहरुखचे आभार मानले.

आता मात्र अशी बातमी समोर येत आहे की शाहरुख खानने आपले कार्यालय आयसीयूमध्ये रूपांतरित केले आहे, जेणेकरून गंभीर रूग्णांवर चांगले उपचार करता येतील. मुंबई मिररच्या अहवालानुसार शनिवारी त्याचे 15 बेडच्या आयसीयूमध्ये रूपांतर झाले आहे. हे काम शाहरुखच्या मीर फाउंडेशन आणि हिंदुजा हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे केले आहे. शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या कार्यालयाची इमारत दिली, परंतु डॉक्टरांची कमतरता असल्याने बीएमसीने मेपर्यंत ते वापरले नव्हते.

यापूर्वी शाहरुख खानने 25000 पीपीई किट दान केली आहेत. शाहरुख खानने यापूर्वी सरकारी निधी आणि संस्थांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. शाहरुख खानच्या या मदतीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शाहरुखचे आभार मानले.

Leave a Comment