शाहरुख खानच्या मुलाला अटक; इतर जणांवर देखील कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग सेवन प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अखेर अटक करण्यात आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघांशी चौकशी झाली असून त्यांना वाद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे

एनसीबीनं काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन खान क्रुझवर उपस्थित होता. त्यामुळे त्याची चौकशी सुरु होती. अखेर त्याला अटक करण्यात आली.