नाशिकमध्ये ‘बर्निंग ट्रेन’ चा थरार!! उभी असलेली एक्सप्रेस पेटली, प्रवाशांची पळापळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर इंजिनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शालिमार- हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला ही आग लागली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे.

मुंबईकडे येणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या बोगीला नाशिक येथे असताना सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. या आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. आग वाढतच गेल्याने प्रवाशांनी पटापट जीवमुठीत घेऊन रेल्वेतून उड्या मारल्या. आगीची माहिती होताच रेल्वेचे इंजिन डब्यांपासून वेगळे करण्यात आले. आग कशी लागली, याबाबत अजून स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ट्रेन 18030 शालीमार ते एलटीटी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पार्सल व्हॅनमध्ये (लगेज डब्बा. या बोगीमध्ये प्रवासी नाही) आग लागल्याने थांबत आहे. आग आता नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रवाशाला/कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही. इंजिनच्या शेजारी असलेली लगेज कंपार्टमेंट/पार्सल व्हॅन ट्रेनमधून वेगळी करण्यात आली आहे आणि लवकरच ट्रेन पुन्हा सुरक्षितपणे सुरू होईल असं त्यांनी म्हंटल आहे.